भटक्यांसाठी असावे मंत्रालय
By Admin | Published: January 16, 2017 01:43 AM2017-01-16T01:43:06+5:302017-01-16T01:43:21+5:30
ठराव : भटक्या विमुक्तांच्या दहाव्या संमेलनाचा समारोप
नाशिक : विमुक्त जाती, भटक्या जमातीचे प्रश्न सोडविण्यासाठी भटक्यांचे स्वतंत्र मंत्रालय असावे, असा ठराव करण्याबरोबरच समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरण जाहीर करावे, अशी मागणी भटक्या विमुक्तांच्या संमेलनात करण्यात आली.
क्रांतिवीर वसंतराव नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात भटक्या विमुक्तांच्या संमेलनात दुसऱ्या दिवशी ‘भटक्या विमुक्त महिलांचा सर्वांगीण विकास शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या दुर्लक्षामुळे होत नाही हे खरे आहे काय?’ या विषयावर परिसंवादात विचारमंथन झाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील विधी अधिकारी अॅड. ज्योती भारती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिसंवादात
प्रा. सुनीता पाटील, ज्योती दुबे, वंदना उगले व कविता मानकर यांनी त्यांचे विचार मांडताना समाजाच्या तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षणासोबतच आरोग्य शिक्षण, आहार
शिक्षण आदि विविध विषयांविषयीच्या ज्ञानाचा प्रसार होण्याची गरज व्यक्त केली.
त्यासाठी प्रत्येक कुटुंबातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून, त्यासाठी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अत्यावश्यक आहे.