दुगाव येथील अल्पवयीन युवतीची आत्महत्त्या
By admin | Published: October 28, 2015 11:26 PM2015-10-28T23:26:58+5:302015-10-28T23:27:52+5:30
दुगाव येथील अल्पवयीन युवतीची आत्महत्त्या
Next
नाशिक : विषारी औषध सेवन करून एका अल्पवयीन युवतीने आत्महत्त्या केल्याची घटना दुगाव येथे घडली आहे़ आत्महत्त्या केलेल्या युवतीचे नाव सारिका रंगनाथ नवसे (१७, रा. दुगाव, ता. नाशिक) असे आहे. मंगळवारी (दि़ २७) सकाळच्या सुमारास घरी कोणी नसताना तिने विषारी औषध सेवन केले होते़ हा प्रकार लक्षात येताच वडील रंगनाथ नवसे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़ आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)