अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By admin | Published: June 26, 2017 12:20 AM2017-06-26T00:20:56+5:302017-06-26T00:21:17+5:30
जायखेडा : बागलाण तालुक्यातील महड येथील १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मेहुणीवर लग्नाचे आमिष व जिवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या मेहुण्याने वारंवार अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जायखेडा : बागलाण तालुक्यातील महड येथील १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मेहुणीवर लग्नाचे आमिष व जिवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या मेहुण्याने वारंवार अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. जायखेडा पोलिसांनी नराधम मेहुण्यास अटक केली असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन गरोदर राहिल्याने व अर्भक गर्भाशयात मेल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महड येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच बहिणीचा पती विठ्ठल सोनवणे (२५) याने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत व तिला धमकावून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. यामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडीत मुलगी सातवीची विद्यार्थिनी आहे. तिला पोटात त्रास होऊ लागल्याने. पीडितेच्या आईने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात तिला पाठविले; मात्र परिस्थितीचे
गांभीर्य लक्षात घेता धुळे जिल्हा रुग्णालयात पीडित मुलीस तातडीने हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याची व गर्भाशयात अर्भक दगावल्याची गंभीर बाब समोर आली. या प्रकरणी धुळे पोलिसांत प्रथम गुन्हा दाखल करण्यात येऊन नंतर जायखेडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पीडीत मुलीच्या आईने जायखेडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. संशयित आरोपी विठ्ठल सोनवणे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जायखेडा पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून एका तरु णास अटक केली; मात्र मेहुण्याच्या दबावामुळे पीडित मुलीने चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता दिशाभूल करण्यासाठी मेहुण्याने दबाव टाकून, धाक दाखवून निरपराध तरु णास यात गोवल्याचे व मेहुणाच या कृत्यास कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले.
जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पहाटे तीनच्या सुमारास महड जंगलातील आरोपीचे घर गाठले. परंतु संशयितास सुगावा लागल्याने त्याने अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी सिनेस्टाइलने एक-दीड किलोमीटरपर्यंत आरोपीचा पाठलाग करून आरोपीस पकडले. रात्रीच्या अंधारात आरोपीचा पाठलाग करताना पडल्याने पोलीस कर्मचारी निंबा खैरनार जखमी झाले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी कुठलीही तमा न बाळगता झडप मारून आरोपीस ताब्यात घेतले.