रस्ता कामात गौण खनिजाचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:53 AM2018-07-09T00:53:50+5:302018-07-09T00:54:09+5:30
नांदगाव : जळगाव बु।। जळगाव खु., पिंपरखेड, परधाडी शिवार, न्यायडोंगरी आदी महसुली भागातील लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, गावतळे, ओढे, नदी-नाले यातील गौण खनिजाचा वापर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता कामात करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य अश्विनी आहेर यांनी केली आहे.

या भागात उपलब्ध गौण खनिजे रस्ता कामासाठी वापरल्यास खर्चाविना विकास साधला जाईल तसेच नदी, नाले, ओढे खोल केल्यास मोठ्या प्रमाणामध्ये पाणी अडविले जाऊन पुनर्भरणाचे काम होणार आहे. दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयाच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो, याकडे अश्विनी आहेर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
परिणामी पाण्याचे पुनर्भरण, पाणी अडविले जाऊन या भागाच्या दुष्काळी स्थितीवर मात करणे शक्य होईल होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. याकरिता तसे आदेश संबंधित यंत्रणेला, कंत्राटदाराला व महसूल अधिकारी, गटविकास अधिकारी यांना विनाविलंब देण्यात यावे, अशी विनंती त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.