अल्पवयीनांवरील अत्याचाराची ‘तिशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 11:52 PM2017-08-08T23:52:34+5:302017-08-09T00:15:03+5:30

गत सात महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तीस गुन्हे दाखल आहेत़ त्यामध्ये जुलैतील दोन गुन्ह्यांचा समावेश असून, मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील तेरा, तर अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सोळा वर्षीय महाविद्यालयीन मुलीस धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचा समावेश आहे़ विशेषत: मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक असून, त्यामानाने मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे़

Minority abuse | अल्पवयीनांवरील अत्याचाराची ‘तिशी’

अल्पवयीनांवरील अत्याचाराची ‘तिशी’

Next

नाशिक : गत सात महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तीस गुन्हे दाखल आहेत़ त्यामध्ये जुलैतील दोन गुन्ह्यांचा समावेश असून, मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील तेरा, तर अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सोळा वर्षीय महाविद्यालयीन मुलीस धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचा समावेश आहे़ विशेषत: मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक असून, त्यामानाने मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे़
अल्पवयीन मुले त्यातही विशेषत: लहान मुलींना चॉकलेट वा इतर खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींकडून लैंगिक शोषण वा अत्याचार केले जात असल्याचे समोर आले आहे़ गत जुलैमध्ये शहरातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या भारतनगर परिसरातील तेरा वर्षीय मुलगी दुपारच्या सुमारास घरात एकटी होती़ पूर्वीची ओळख असलेला तीस वर्षीय अली नावाच्या संशयिताने बळजबरीने घरात प्रवेश करून या मुलीचा विनयभंग केला़ विशेष म्हणजे विनयभंग केल्यानंतर तिला शिवीगाळ तसेच दमदाटी करून संशयित फरार झाला असून, त्याच्यावर पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Minority abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.