सावानामध्ये दर्पणकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:51+5:302021-01-08T04:41:51+5:30
नाशिक : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राच्या निमित्ताने सुरू झालेल्या पत्रकारितेच्या पर्वाच्या स्मृतिनिमित्त सर्वत्र पत्रकार दिन साजरा ...
नाशिक : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राच्या निमित्ताने सुरू झालेल्या पत्रकारितेच्या पर्वाच्या स्मृतिनिमित्त सर्वत्र पत्रकार दिन साजरा होतो. सार्वजनिक वाचनालयात पत्रकार दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमप्रसंगी लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल आणि टायपोग्राफीचे रंगरेषाकार सुनील धोपावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी धोपावकर यांनी समाजात विचार करण्याची पद्धत, भाषा शैली बदलत चालली असून, वाचन चळवळीला वेग देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन बी. जी. वाघ यांनी केले. ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाचनालयाचे कार्याध्यक्ष वसंत खैरनार, बालभवन प्रमुख संजय करंजकर, ॲड. अभिजीत बगदे, तसेच भालचंद्र देसले उपस्थित होते.
इन्फो
सत्व आणि तत्व जपण्याची गरज
या कार्यक्रमात बोलताना लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी समाजापुढे सध्या अभिव्यक्त कसे व्हावे, याचेच मोठे आव्हान असल्याचे सांगितले. लोकशाहीच्या तीन स्तंभांना जिथे हादरे बसले, तिथे पत्रकारितेचा चौथा स्तंभदेखील काहीसा डगमगणे साहजिकच आहे; मात्र हा स्थित्यंतराचा काळ प्रत्येक क्षेत्रावर येत असतो. यापूर्वीच्या काळातही पत्रकारितेपुढे वेगवेगळी आव्हाने होती; मात्र कोरोनामुळे संपूर्ण समाजाची जीवनशैलीच बदलून गेली आहे. अशा परिस्थितीत पत्रकारितेचे सत्व आणि तत्व जपत पुढे जाण्याची गरज असल्याचे लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी नमूद केले.
फोटो -- ०६पीएचजेएन ०६२
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना बी.जी.वाघ, संजय करंजकर, देवदत्त जोशी, सुनील धोपावकर, भालचंद्र देसले, जयप्रकाश जातेगावकर, ॲड. अभिजीत बगदे, वसंत खैरनार.