१७ लाख रुपयांच्या फळ व गॅस शेगड्यांचा अपहार, दादरा नगर हवेलीतील दोघांवर गुन्हा

By नामदेव भोर | Published: July 3, 2023 04:31 PM2023-07-03T16:31:37+5:302023-07-03T16:32:26+5:30

आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

misappropriation of fruits and gas grills worth 17 lakh crime against two in dadra nagar haveli | १७ लाख रुपयांच्या फळ व गॅस शेगड्यांचा अपहार, दादरा नगर हवेलीतील दोघांवर गुन्हा

१७ लाख रुपयांच्या फळ व गॅस शेगड्यांचा अपहार, दादरा नगर हवेलीतील दोघांवर गुन्हा

googlenewsNext

नामदेव भोर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : शहरालगतच्या आडगाव शिवारातील परफेक्ट डाळींब मार्केट येथून गुवाहाटीला पोचविण्यासाठी दिलेला सतरा लाख २४ हजार रुपयांचा डाळिंब माल व सूर्यावुड कंपनीच्या गॅस शेगड्या गुवाहाटीला न पोहोचविता त्या मालाचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी दादरा नगर हवेलीतील दोघा संशयितांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूकप्रकरणी आडगाव परिसरातील सुस्वराज सोसायटी समर्थनगरला राहणाऱ्या सरताज मुस्ताक खान यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून खान यांनी गेल्या आठवड्यात (दि.२८) उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राहणाऱ्या संशयित अंकित रामसिंग सेंगर आणि दादरा नगर हवेलीतील राहुल धर्मेंद्र यादव यांच्याकडे महिंद्रा वाहन (क्रमांक डीडी ०२ जी ६२६९) मधून सुमारे १७ लाख २४ हजार रुपये किमतीचा डाळिंब माल व सूर्यावुड कंपनीच्या गॅस शेगड्या गुवाहाटीला पोहोचविण्यासाठी दिल्या होत्या. मात्र संशयितांनी हा माल गुवाहाटीला न पोहोचविता त्या मालाचा परस्पर अपहार केल्याने या प्रकरणात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस हवालदार सुरेश नरवडे करत आहेत.

Web Title: misappropriation of fruits and gas grills worth 17 lakh crime against two in dadra nagar haveli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.