काँग्रेसकडून मुस्लीम समाजाची दिशाभूल : योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 12:42 PM2024-05-19T12:42:23+5:302024-05-19T12:42:41+5:30
मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या प्रांगणात धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
मालेगाव (नाशिक) : निवडणूक प्रचारात काँग्रेसकडून मुस्लिम समाजाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील योजना या केवळ हिंदूंसाठी नव्हे, तर मुस्लिम समाजासाठीदेखील आहेत, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या प्रांगणात धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. अजित गोपछडे, अनिल बोंडे, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
भारतात राहून पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवा, मग त्यांना तेथील खरी परिस्थिती समजेल, असेही त्यांनी सुनावले. मोदी सरकारच्या काळातच राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.