नाशिकच्या रेणू वाळकेने जिंकला ‘मिस एसएमआरके’चा मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:57 PM2017-12-22T15:57:01+5:302017-12-22T15:58:00+5:30
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत घेण्यात आलेल्या सौंदर्यस्पर्धेत रेणू वाळके ही मिस एसएमआरकेची मानकरी ठरली. विविध निकषांवर अटीतटीने झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी ठोंबरे हिने पटकावला, तर धनश्री क्षत्रिय उपविजेती ठरली.
परशुराम सायखेडकर सभागृहात शुक्रवारी (दि.२२) महाविद्यालयाचा विविध कलागुणदर्शन कार्यक्र म व सौंदर्य स्पर्धा उत्साहात पार पडली. महाविद्यालयाचे खास वैशिष्ट्य असणारी ‘मिस.एस.एम.आर.के’ स्पर्धेकडे साºयांचे लक्ष लागले होते. स्पर्धेच्या उत्स्फूर्त वक्तृत्व, मुलाखत, निबंध लेखन या प्राथमिक फेरीतून एकूण १२ विद्यार्थिनी अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. अंतिम फेरीत सर्व परिचय, टेलेन्ट राउंड सिच्युएशन राउंड व परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अशा तीनफेºया आहेत. या वर्षी रोहिणी पाटोळे, गौरी पटवर्धन व मिनू धाम यांनी परीक्षक म्हणून काम केले. फक्त बाह्य सौंदर्य नाही तर बुद्धिमत्ता व आत्मविश्वास याचा कस लावणारी ही स्पर्धा होती.
विविध गुण दर्शनाची स्पर्धा ही विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगली. स्पर्धेचा प्रारंभ गणेश वंदनेने झाला. विविध नृत्याविष्कारातून राधा-कृष्णाचे प्रेम, गोपिकांची अदाकारी सादर केली. काळजाचा ठोका चुकविणारा सोलर डान्स ही प्रभावी पद्धतीने सादर केला गेला. तसेच भारतातील विविध प्रांताच्या वेशभूषा करून मुलींनी फॅशन शो सादर केला. स्पर्धेत समूह नृत्य, एकर नृत्य, समूह नृत्य, अभिनय, गीत गायन आदी प्रकार सादर झाले.