बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह पाच दिवसांनंतर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:46 PM2019-09-09T16:46:47+5:302019-09-09T16:47:07+5:30

वेळुंजे : वैतरणा-आळवंडी धरणात मासेमारीसाठी गेलेल्या तालुक्यातील वावीहर्षे येथील पिंटू वाळू शिद (१८) हा तरु णाचा मृतदेह अखेर पाच ...

The missing fisherman's body was found five days later | बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह पाच दिवसांनंतर सापडला

बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह पाच दिवसांनंतर सापडला

Next
ठळक मुद्देतरुणाचा मृतदेह नदीच्या काठावरील जाळीला अडकल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

वेळुंजे : वैतरणा-आळवंडी धरणात मासेमारीसाठी गेलेल्या तालुक्यातील वावीहर्षे येथील पिंटू वाळू शिद (१८) हा तरु णाचा मृतदेह अखेर पाच दिवसांच्या शोधकार्यानंतर सोमवारी (दि.९) दुपारी सापडला आहे. गेल्या गुरुवारी (दि.५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास वैतरणा-आळवंडी धरणात मासेमारी गेला होता. मात्र, काठावर त्याचे कपडे व मोबाईल आढळून आले असून तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आले होते.
पिंटू शिद हा ट्यूबवर बसून मासेमारीसाठी लावलेले जाळे काढण्यासाठी गेला होता. परंतु, त्याची ट्यूब कडेला लागली तेव्हा अन्य मासेमारी करणाऱ्यांना तो बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शोध कार्य सुरू करण्यात आले होते. यात शासकीय यंत्रणा देखील सहभागी झाली होती. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे हे लक्ष परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. दरम्यान, पाच दिवसांपासून कुठलाच ठाव ठिकाणा न लागल्याने तरु णाचे कुटुंबिय शोध कार्याकडे डोळे लावून बसले होते. मात्र, सोमवारी दुपारी त्र्यंबकेश्वर सह तालुक्यातील पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चालू होता. त्यामुळे तरुणाचा मृतदेह नदीच्या काठावरील जाळीला अडकल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. याबाबत श्रमजीवीचे भगवान मधे यांनी प्रशासनाला माहिती कळविली. त्यानंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.
मृतदेह शासकीय कार्यवाहीनंतर कुटुंबीयांच्या ताब्यात
गेल्या पाच दिवसांपासून शोध कार्य सुरू होते. आम्ही घटना झाली तेव्हा पासून परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. शोध कार्यात कुठेही खंड पडू दिला नाही. तरुणाचा मृतदेह शासकीय कार्यवाहीनंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.
- दीपक गिरासे, तहसिलदार, त्र्यंबकेश्वर

Web Title: The missing fisherman's body was found five days later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.