अविश्वास ठरावाद्वारे भाजपाकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:20 AM2018-08-27T01:20:27+5:302018-08-27T01:21:06+5:30

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

Misunderstanding by the BJP through an unbelief resolution | अविश्वास ठरावाद्वारे भाजपाकडून दिशाभूल

अविश्वास ठरावाद्वारे भाजपाकडून दिशाभूल

googlenewsNext

नाशिक : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.  सत्ताधारी भाजप तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून नाशिककरांच्या डोळ्यात धूळफेक व दिशाभूल करीत आहे़ जनतेचा कळवळा असल्याचे दाखविण्यासाठी सत्ताधाºयांकडून आयुक्तांवर अविश्वास ठराव आणला जाईल आणि सरकारकडून तो पुढे विखंडित केला जाईल. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही स्क्रिप्ट असल्याने हा शुद्ध नाशिककरांच्या भावनांशी खेळ आहे. सरकारकडून अविश्वास ठरावांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे यापूर्वीही तुकाराम मुंडे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना जनतेने बघितले आहे. पनवेल मनपाचा सुद्धा अविश्वास ठराव शासनाने विखंडित केल्याचे यापूर्वी घडले आहे. केवळ अविश्वास ठरावाद्वारे जनतेची दिशाभूल करून एक राजकीय खेळी करण्याचा कुटील डाव भाजपकडून खेळला जात असून, जनआंदोलनद्वारे हा कुटील डाव हाणून पाडू, असे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे़ सर्वसामान्य नाशिककरांना न परवडणारी करवाढ, सिडकोसह गावठाणातील घरांचा प्रश्न, अंगणवाड्या बंद करणे, त्याचबरोबर कर्मचाºयांची पिळवणूक या विषयांमध्ये आम्ही नाशिककरांबरोबर आहोत. नाशिकमधील सत्ताधारी, वजनदार आमदार आणि महापौर हे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एक दिवसात आयुक्तांची बदली करून आणू शकतात़ मग हे अविश्वासाचे नाटक का? महासभेत करवाढ फेटाळून लावली तरी आयुक्तांनी करवाढीची अंमलबजावणी करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. असा आरोप भुजबळ यांनी केला.
आंदोलन छेडू
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडून जनतेची ताकद लवकरच सत्ताधाºयांना दाखवून देऊ. राष्ट्रवादीचे आंदोलन इतके तीव्र असेल की एकाही अधिकाºयाला खुर्चीवर बसू देणार नाही, अशी प्रतिक्रिया समीर भुजबळ यांनी दिली आहे़

Web Title: Misunderstanding by the BJP through an unbelief resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.