कोरेगावचा मिथुन माने वसंत करंडकचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:01+5:302021-02-07T04:15:01+5:30

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वसंत करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व ...

Mithun Mane of Koregaon is the standard bearer of Vasant Karandak | कोरेगावचा मिथुन माने वसंत करंडकचा मानकरी

कोरेगावचा मिथुन माने वसंत करंडकचा मानकरी

Next

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वसंत करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोरेगाव महाविद्यालयातील मिथुन माने याने प्रथम पारितोषिक पटकावत वसंत करंडक जिंकला आहे. त्याला ७००१ रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

केव्हीएन नाईक महाविद्यालयात शनिवारी (दि. ६) वसंत करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या वसंत करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांतून ५३ विद्यार्थी सहभाग नोंदवीत आपल्या वक्तृत्व कौशल्याचे सादरीकऱण केले. यात कोरेगाव महाविद्यालयातील मिथुन दत्तात्रय माने याने वसंत करंडकावर नाव कोरत प्रथम क्रमांक पटकावला. त्याला सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कल्याणच्या बी.के. बिर्ला महाविद्यालयातील यश रवींद्र पाटील याने मिळविले असून त्याला पाच हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर विद्यावर्धिनी सभेच्या धुळे महाविद्यालयातील प्रसाद देविदास जगताप याने तृतीय क्रमांक राखला असून त्याला तीन हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या हर्षवर्धन चंद्रकांत आलासे याला उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्याच आले. वक्तृत्व स्पर्धेत डॉ. ज्ञानोबा ढगे आणि डॉ. संभाजी शिंदे यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली. दरम्यान, विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. पी.आर. गीते, विश्वस्त अशोक आव्हाड, दिगंबर गीते, विलास आव्हाड, विष्णू नागरे, प्राचार्य वसंत वाघ, डॉ. नंदादेवी बोरसे आदींच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

===Photopath===

060221\06nsk_48_06022021_13.jpg

===Caption===

वसंत करंडकाचा मानकरी मिथुन माने यास चषक प्रदान करताना के.व्ही. एन. नाईक संस्थेचे उपाध्यक्ष अड.पी.आर. गीते. समवेत  अशोक आव्हाड, दिगंबर गीते,विलास आव्हाड, विष्णू नागरे, वसंत वाघ, डॉ. नंदादेवी बोरसे आदी

Web Title: Mithun Mane of Koregaon is the standard bearer of Vasant Karandak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.