जंतनाशक मोहिमेत मातांची भूमिका महत्त्वाची शीतल सांगळे : कुंदेवाडी येथे जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ; परिसर स्वच्छतेचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:24 PM2018-02-10T23:24:48+5:302018-02-11T00:44:12+5:30
सिन्नर : सदृढ व निरोगी पाल्यांच्या आरोग्यात मातांची भूमिका महत्त्वाची असते. जंतनाशक मोहिमेला व्यापक स्वरूप देतानाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी मातांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी.
सिन्नर : सदृढ व निरोगी पाल्यांच्या आरोग्यात मातांची भूमिका महत्त्वाची असते. जंतनाशक मोहिमेला व्यापक स्वरूप देतानाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी मातांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथे जिल्हास्तरीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सरपंच सुनीता पोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा भालेराव, विस्तार अधिकारी आशावरी केदारी, वैशाली शिंदे, प्रकाश शिरसाठ, तालुका आरोग्य समन्वयक किरण सोनवणे, हेमंत भुजबळ, राजू सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी सांगळे यांच्या हस्ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. तालुक्यात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या, प्राथमिक शिक्षकांकडे लहान मुलांसाठी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी प्रास्ताविकातून दिली. यावेळी नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे राजेंद्र सातपुते, अभिजित देशमुख, दत्ता लोणारे, प्रतिभा कर्डक, आशा जगताप, ललिता साळुंके आदी उपस्थित होते.