Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ!कोर्टाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 02:06 PM2023-03-08T14:06:27+5:302023-03-08T14:12:20+5:30
Bacchu Kadu : माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका आयुत्तांवर हात उगारला होता.
Bacchu Kadu : माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका आयुत्तांवर हात उगारला होता. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती. आज कोर्टाने आमदार कडू यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सनावली आहे.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे आज आमनेसामने येणार; विधानभवनात मविआची बैठक
नेमकं प्रकरण काय?
प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी २०१७ साली दिव्यांगांच्या मागणीसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन केलं होतं. यावेळी अभिषेक कृष्णा नावाच्या आयुक्तांवर बच्चू कडू यांनी हात उगारल्याचा आरोप आहे. यावेळी आयुक्त यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात आता नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे, दमदाटी करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अशा दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली आहे.
जामीन मंजूर
आमदार बच्चू कडू यांना १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद स्विकारले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आमदार कडू ही गुवाहाटीमध्ये गेले होते.
आमदार बच्चू कडू नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसापूर्वी आमदार रवी राणा आणि त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत त्यांच्यातील वाद मिटवला होता.