आमदार बोरसे यांची स्वतःला कोंडून घेत गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 07:11 PM2021-03-24T19:11:59+5:302021-03-25T00:50:16+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यात वारंवार कोसळणारे अस्मानी संकट अशा भयावह परिस्थितीतही शेतकऱ्यांकडून वीजबिलांच्या वसुलीसाठी केली जात असलेली कृषिपंपाची वीज तोडणी, सक्तीची कर्ज वसुली अशा राज्यातील शेतकरीविरोधी सरकारच्या निषेधार्थ आमदार दिलीप बोरसे यांनी केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात स्वतःला तब्बल दीड तास कोंडून घेत गांधीगिरी केली.

MLA Borse confines himself to Gandhigiri | आमदार बोरसे यांची स्वतःला कोंडून घेत गांधीगिरी

केरसाणे येथे आमदार दिलीप बोरसे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतःला कोंडून घेत गांधीगिरी आंदोलन केले. यावेळी कार्यालयाबाहेर जमलेले शेतकरी व ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देसटाणा : शेतकरीविरोधी राज्य सरकारचा केला निषेध

सटाणा : बागलाण तालुक्यात वारंवार कोसळणारे अस्मानी संकट अशा भयावह परिस्थितीतही शेतकऱ्यांकडून वीजबिलांच्या वसुलीसाठी केली जात असलेली कृषिपंपाची वीज तोडणी, सक्तीची कर्ज वसुली अशा राज्यातील शेतकरीविरोधी सरकारच्या निषेधार्थ आमदार दिलीप बोरसे यांनी केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात स्वतःला तब्बल दीड तास कोंडून घेत गांधीगिरी केली.

दरम्यान, आमदार बोरसे यांच्या गांधीगिरीमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून तत्काळ बिलांसाठी बंद केलेले ट्रान्सफार्मर चालू करण्यात आल्याने गांधीगिरी आंदोलन मागे घेण्यात आले.
बागलाण तालुक्यात गेल्या महिन्यात तसेच चार दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने पूर्णपणे शेतीव्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना राज्य सरकारने तातडीची मदत शेतकऱ्यांना करण्याची आवश्यकता असताना राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची गळचेपी होत असल्याचा आरोप करत भाजपचे आमदार दिलीप बोरसे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शर्मा यांनी बुधवारी (दि.२४) सकाळी ११ वाजता केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात स्वतःला कोंडून घेत आंदोलन सुरू केले.

आमदार बोरसे यांनी अचानक केलेल्या या गांधीगिरीमुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. जोपर्यंत वीजबिलांच्या वसुलीसाठी बंद केलेले ट्रान्सफॉर्मर सुरू करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका आमदार बोरसे यांनी घेतल्याने तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, वीज महावितरण कंपनीचे अभियंता पाटील, पोलीस यंत्रणा यांनी धाव घेतली.
यावेळी तहसीलदार इंगळे पाटील यांनी संबंधित वीज महावितरण कंपनीच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांशी संपर्क साधून केरसाणे येथील ट्रान्सफॉर्मर चालू करून वीजपुरवठा सुरळीत केल्याने आमदार बोरसे यांनी दीड तासांनंतर आपले गांधीगिरी आंदोलन मागे घेतले.

Web Title: MLA Borse confines himself to Gandhigiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.