नाशिकमध्ये कॅफेमध्ये युवक युवतींसाठी खास सोय असलेल्या ठिकाणी आमदार फरांदे यांचा छापा
By संजय पाठक | Updated: March 1, 2025 14:27 IST2025-03-01T14:25:48+5:302025-03-01T14:27:19+5:30
एका कॅफेमध्ये तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आज दुपारी येथे अचानक छापा टाकला.

नाशिकमध्ये कॅफेमध्ये युवक युवतींसाठी खास सोय असलेल्या ठिकाणी आमदार फरांदे यांचा छापा
नाशिक- शहरातील गंगापूररोडवरील एका कॅफेमध्ये तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आज दुपारी येथे अचानक छापा टाकला यावेळी पोलीसांनी सात ते आठ जोडप्यांना ताब्यात घेतले.
नाशिकमध्ये मध्यंतरी एमडी ड्रग्ज प्रकरण गाजल्यानंतर पोलिसांनी कॅफे शोधून त्यातील गैरव्यवहार प्रकरणी कारवाई देखील केली होती. त्यानंतर आता कारवाई थंडावली असली तरी अनेक कॅफे केवळ युवक युवतींसाठीच सोयीचे असून हॉटेलमध्ये पडदे लावून त्यांच्यासाठी खास सोय करून दिली जाते.
अत्यंत अंधार असलेल्या या कॅफेमंधील उद्योगांविषयी तक्रारी असतानाच आज दुपारी आमदार देवयानी फरांदे यांनी विद्या विकास सर्कल जवळील हॉटेल मोगली कॅफे येथे पोलिसांना घेऊन धडक दिली. यावेळी हॉटेलमधून सात ते आठ युवक युवतीच्या जेाड्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अद्यापही चौकशी सुरूच असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.