आमदार रोहीत पवार यांनी पाठवले त्र्यंबकेश्वर देवस्थानला सॅनीटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 03:42 PM2020-04-18T15:42:26+5:302020-04-18T15:43:12+5:30

त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र राज्यातील एक उदयोन्मुख, संवेदनशील, कृतीशील नेता कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार ज्यांनी शासनाच्या व्यतीरीक्त वैयक्तीक पातळींवर राज्यातील सर्व जिल्ह्यातील शासकीय हॉस्पीटलसह महत्वाची देवस्थाने त्यात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व सप्तश्रृंगी गड येथे प्रत्येकी शंभर लीटर सॅनीटायझर भेट दिले.

MLA Rohit Pawar sent sanitizer to Trimbakeshwar temple | आमदार रोहीत पवार यांनी पाठवले त्र्यंबकेश्वर देवस्थानला सॅनीटायझर

यावेळी विश्वस्त प्रशांत गायधनी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विजय गांगुर्डे देवस्थानचे व्यवस्थापक राजाभाऊ जोशी यादव भांगरे आदिं उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर व सप्तश्रृंगी गड येथे प्रत्येकी शंभर लीटर सॅनीटायझर भेट

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र राज्यातील एक उदयोन्मुख, संवेदनशील, कृतीशील नेता कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार ज्यांनी शासनाच्या व्यतीरीक्त वैयक्तीक पातळींवर राज्यातील सर्व जिल्ह्यातील शासकीय हॉस्पीटलसह महत्वाची देवस्थाने त्यात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व सप्तश्रृंगी गड येथे प्रत्येकी शंभर लीटर सॅनीटायझर भेट दिले.
राज्यात कोरोना - कोवीड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता एक दुरदृष्टी तथा कृतीशील नेता कसा असतो यांचे दर्शन याच सेवेतून घडते. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला शंभर लीटर सॅनीटायझर देण्यात आले.
परमेश्वर कृपेने लॉकडाउन वाढो ना वाढो परंतु जर जनजीवन सुरळीत झाले त्र्यंबकेश्वरला भाविकांचा काही प्रमाणात वर्दळ सुरू झाली तर तुटवडा असलेल्या हँड सॅनीटायझर चा वापर मंदीरातील कर्मचार्यांना पोलीसांकरिता व त्यातुन कोरोना पासुन सुरक्षा राखता येईल हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवुन कर्जत -जामखेड मतदार संघाचे आमदार ,मा.शरद पवार यांचे नातु रोहीतदादा पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग यांचेशी फोनवरु न संपर्क करु न माहिती घेतली व सॅनीटायझर पाठविले. यावेळी विश्वस्त प्रशांत गायधनी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलग राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विजय गांगुर्डे देवस्थानचे व्यवस्थापक राजाभाऊ जोशी यादव भांगरे आदिं उपस्थित होते.
प्रशांत गायधनी यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे सॅनीटायझर घेवुन आलेल्या कर्मचार्याचा सत्कार करून आ.रोहीत दादा पवारांचे आभार मानले. 

Web Title: MLA Rohit Pawar sent sanitizer to Trimbakeshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.