आमदार निधीतून दिव्यांगांसाठी निधी देण्याची प्रहारची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:23+5:302021-05-23T04:14:23+5:30
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना भेटून याबाबत पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. आमदार खोसकर यांनी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, ...
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना भेटून याबाबत पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. आमदार खोसकर यांनी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीत दिव्यांग बांधवांचे प्रचंड हाल होत आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग बांधवांना आमदार निधीतून दिव्यांग ५ टक्के निधी गरजु दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा. यामुळे दिव्यांग बांधवांचे जीवन उंचावण्यासाठी मोठा हातभार लागू शकतो. याप्रश्नी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे एक आढावा बैठक घेऊन समाजातील दुर्बल घटक यांच्या समस्या सोडवण्याबाबत उपाय योजना कराव्यात. दिव्यांग बांधव व निराधार यांच्या समस्या सोडवण्याबाबत प्राधान्यक्रम देऊन न्याय द्यावा, असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, काँग्रेस नेते संदीप गुळवे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष सपन परदेशी, अनिल कोरडे, पढेर उपस्थित होते.
कोट....
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन झाल्यापासून तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील आमदारांनी आमदार निधीतील ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर जमा करून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा द्यावा.
- नितीन गव्हाणे, तालुकाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना.
फोटो- २२ हिरामण खोसकर
दिव्यांग व्यक्तींना निधी देण्याबाबतचे निवेदन आमदार हिरामण खोसकर यांना देताना प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे व इतर पदाधिकारी.
===Photopath===
220521\22nsk_21_22052021_13.jpg
===Caption===
फोटो- २२ हिरामण खोसकर दिव्यांग व्यक्तींना निधी देण्याबाबतचे निवेदन आमदार हिरामण खोसकर यांना देतांना प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप गुळवे व इतर पदाधिकारी.