वीजप्रश्नी बैठकीला आमदारांची दांडी
By admin | Published: February 1, 2016 11:43 PM2016-02-01T23:43:42+5:302016-02-01T23:44:35+5:30
उद्योजक नाराज : अनिल कदम उद्योगमंत्र्यांकडे मांडणार कैफियत
सातपूर : औद्योगिक संघटनांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी शहरातील भाजपाचे आमदार अनुपस्थित राहिल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली, तर एकमेव उपस्थित शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी भाजपाची खिल्ली उडवत शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई हेच वीजदरासंदर्भातील तोडगा काढतील, असे सांगून उद्योजकांना आश्वस्त केले, तर उद्योजकांनी उत्तर महाराष्ट्र स्तरावर आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर केला.
राज्य सरकारने फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजकांसाठी विजेच्या दरात सवलत देण्याच्या निर्णयावर जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींसमवेत औद्योगिक संघटनांची निमात बैठक बोलाविण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेऊन दुजाभाव केला आहे. उद्योग खाते शिवसेनेकडे असून, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मंगळवारी (दि.२) हा मुद्दा उपस्थित करून अन्याय दूर करण्याची मागणी करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, संतोष मंडलेचा, विवेक पाटील, संजय महाजन, मनीष कोठारी, मंगेश पाटणकर, मिलिंद राजपूत, नगरसेवक शशिकांत जाधव, आशिष नहार, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, व्हीनस वाणी, मनीष रावळ, अजय बाहेती, सुरेंद्र मिश्रा आदिंनी या निर्णयामुळे जिल्ह्णातील स्टील, प्लास्टिक, कास्टिंग, प्लेटिंग या उद्योगांवर होणारा परिणाम, उद्योग उजाड होतील, सरकारने केलेला दुजाभाव अन्यायकारक आहे. उद्योजकांमध्ये निर्माण केलेला वाद विदर्भ वेगळा करण्याचा हा डाव असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. या निर्णयाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच लवकरच उर्वरित महाराष्ट्रातील औद्योगिक संघटनांची बैठक बोलावून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)