मनपाच्या सत्ताधिकाऱ्यांना फरांदे यांचा घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:26 AM2018-07-18T01:26:04+5:302018-07-18T01:26:32+5:30
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात वैद्यकीय असुविधेमुळे महिला फरशीवर प्रसूत झाल्याप्रकरणी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आपल्याच पक्षाच्या सत्ताधिकाºयांना घरचा आहेर दिला असून, २४ तासांत दोषी अधिकाºयांवर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी शासनाला याची गंभीर दखल घेण्यास सांगितले, तर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी यासंदर्भात माहिती घेऊन सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले.

महापालिकेत भाजपाची सत्ता असतानादेखील आमदार फरांदे यांनी संस्थेत योग्य काम होत नसल्याची टीका केली. झाकीर हुसेन रुग्णालयाबाबत पॉइंट आॅफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदर घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना नाशिक महानगरपालिकेत ही पहिली घटना नसून याआधीदेखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या मायको रु ग्णालय व इंदिरा गांधी रु ग्णालय येथेदेखील उपचाराअभावी बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी एका मातेने बालकाचा मृतदेह उपायुक्तांच्या टेबलावर ठेवला होता, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
महिला रुग्णालयाचाही मुद्दा उपस्थित
भाजपाची सत्ता असतानाही महिला रु ग्णालयासाठी जागा देण्यास महापालिका टाळाटाळ करीत आहे. शासनाने २२ फेब्रुवारीस आदेश दिलेले असतानाही महानगरपालिका मात्र दुर्लक्ष करत आहे. शासनाचे लेखी आदेश प्राप्त होऊन चार महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप कारवाई झाली नसल्याची बाब प्रा. देवयानी फरांदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.