आमदारांनी अधिकाºयांना घडवली सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 11:34 PM2017-09-07T23:34:37+5:302017-09-08T00:11:51+5:30
तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेची प्रत्यक्ष माहिती व्हावी व अनुभव यावा म्हणून आमदार अनिल कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना आपल्या वाहनातून फिरवून आणत रस्त्यातील खड्ड्यांचा अनुभव आणून दिला. याची अधिकाºयांनी गंभीर दखल घेत रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे.
निफाड : तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेची प्रत्यक्ष माहिती व्हावी व अनुभव यावा म्हणून आमदार अनिल कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना आपल्या वाहनातून फिरवून आणत रस्त्यातील खड्ड्यांचा अनुभव आणून दिला. याची अधिकाºयांनी गंभीर दखल घेत रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे.
निफाड तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते आणि पिंपळगाव बसवंत ते निफाड या मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, याबाबत कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे, कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार, निफाड उपविभागाचे सहाय्यक अभियंता महेश पाटील या सर्वांना बरोबर घेऊन ओझर, सुकेणे, कोकणगाव, पिंपळगाव, दावचवाडी, रौळस, कुंदेवाडी या गावांना जोडणाºया रस्त्यावरून प्रवास केला. या मोठमोठ्या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना किती यातना होतात याची प्रचिती संबंधित अधिकाºयांना आली. हे खड्डे भयानक मोठमोठे असल्याचे या अधिकाºयांनी मान्य केले.
अधिकाºयांनी सर्वच खड्ड्याच्या रस्त्यांची पाहणी केली. कदम यांनी तालुक्यातील रस्त्यांचे विदारक वास्तव संबंधित अधिकाºयांना प्रत्यक्ष दाखवून या रस्त्यावरील खड्डे बुजवणे, रस्ता दुरु स्ती करणे या मंजूर असलेल्या कामांना गती देऊन ते तत्काळ सुरू करावेत, अशी आग्रही मागणी या अधिकाºयांकडे केली. यानंतर निफाड येथील शासकीय विश्रामगृहात अधिकारी आणि कदम यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांची मंजूर कामे व निधी याविषयी माहिती दिली.