मनपाच्या एलबीटी अनुदानात कपात
By admin | Published: March 6, 2017 01:37 AM2017-03-06T01:37:22+5:302017-03-06T01:37:35+5:30
नाशिक : महापालिकेला आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत एलबीटीचे अनुदान जादा वितरित झाल्याने राज्य शासनाने जानेवारी महिन्याच्या अनुदानात कपात केली
नाशिक : महापालिकेला आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या आठ महिन्यांच्या कालावधीत एलबीटीचे अनुदान जादा वितरित झाल्याने राज्य शासनाने जानेवारी महिन्याच्या अनुदानात कपात केली असून, त्यामुळे महापालिकेच्या हाती अवघे दहा कोटी ९० लाख रुपये पडणार आहेत.
राज्य शासनाने पन्नास कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द केल्याने त्या बदल्यात महापालिकेला दरमहा ३१ कोटी ९४ लाख रुपये अनुदान स्वरूपात दिले जात आहे. याशिवाय, मुद्रांक शुल्कपोटी १ टक्का रक्कमही मनपाच्या खात्यात जमा केली जात आहे. मात्र, आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत महापालिकेला जादा अनुदान वितरित करण्यात आल्याने त्याची रक्कम जानेवारी २०१७ च्या अनुदानातून कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला माहे जानेवारी २०१७ चे केवळ १० कोटी ९० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. फेबु्रवारी अखेर महापालिकेला एलबीटीपोटी सुमारे ७३० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सन २०१६-१७ या वर्षासाठी महापालिकेने ८१० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. (प्रतिनिधी)