मनपा कर्मचारी स्वाइन फ्लूचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:02 AM2017-09-01T01:02:40+5:302017-09-01T01:02:46+5:30
महापालिकेतील नगरसचिव विभागातील कर्मचाºयाचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूमुळे एकूण ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात तर तब्बल ४३ जणांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झालेला आहे.
नाशिक : महापालिकेतील नगरसचिव विभागातील कर्मचाºयाचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूमुळे एकूण ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात तर तब्बल ४३ जणांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झालेला आहे.
महापालिकेमार्फत स्वाइन फ्लूबाबत जागृती केली जात असताना गुरुवारी (दि. ३१) महापालिकेतील कर्मचारी सुनील नामदेव पवार (४७) यांना स्वाइन फ्लूची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला. सुनील पवार यांना चारच दिवसांपूर्वी कुंठीत वेतनश्रेणी लागू होऊन त्यांना वरिष्ठ लिपिकपदी पदोन्नती मिळाली होती. मात्र, या पदोन्नतीचा आनंद त्यांना काळाने घेऊ दिला नाही. दरम्यान, आॅगस्ट महिन्यात शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६० असून, मनपा हद्दीबाहेरील ४५ रुग्णही शहरातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात मनपा हद्दीतील चौघांचा तर हद्दीबाहेरील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत मनपा हद्दीतील १६८ तर हद्दीबाहेरील १५० रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यात हद्दीतील १७ जणांचा तर हद्दीबाहेरील ३० जणांचा मृत्यू झालेला आहे. खोकला, घशात खवखव होणे, ताप व अंगदुखी ही स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत. सदर लक्षणे जाणवू लागल्यानंतर रुग्णांनी तातडीने टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे डोस घ्यावेत. सदर टॅमी फ्लूच्या गोळ्या या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.