आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:16+5:302021-09-05T04:18:16+5:30
कोविडच्या संकटाने त्रस्त झालेल्या जनतेच्या भावनांचा विचार करून मानसिकदृष्ट्या शांती आणि शक्ती देणारी श्रद्धास्थाने असलेली मंदिरे खुली करावी या ...
कोविडच्या संकटाने त्रस्त झालेल्या जनतेच्या भावनांचा विचार करून मानसिकदृष्ट्या शांती आणि शक्ती देणारी श्रद्धास्थाने असलेली मंदिरे खुली करावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ३) महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर विभागाच्या वतीने घंटानाद आणि आरती करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला होता. या आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेतली नसल्याने आंदोलन करणाऱ्या मनसेचे नगरसेवक सलीम शेख, प्रभाग सभापती योगेश शेवरे, योगेश लभडे, सचिन सिन्हा, जय अहिरे, ज्ञानेश्वर बगडे, मिलिंद कांबळे, प्रा. अंबादास आहिरे, जयेंद्र खरात, कामिनी दोंदे, अनिता ठोक, निर्मला पवार, वैभव महिरे, निशांत शेट्टी, विशाल भावले, प्रवीण अहिरे, लक्ष्मण साळवे, अतुल पाटील, राम बिडवे, गणेश जायभावे, सागर निगळ, अक्षय भदाणे, आदींसह २२ कार्यकर्त्यांवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्यासमोर हजर करण्यात आले. या कार्यकर्त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.