मनसेचा कळवणला कार्यकर्ता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 04:57 PM2018-11-06T16:57:27+5:302018-11-06T16:59:18+5:30

कळवण: महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा कळवण विधानसभा मतदार संघातील गट अध्यक्ष व कार्यकर्ता मेळावा कळवण येथे संपन्न झाला.त्यावेळी मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव वसंत फडके उपस्थित होते.

  MNS activists rally rally | मनसेचा कळवणला कार्यकर्ता मेळावा

मनसेच्या कळवण येथील मेळाव्याप्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत फडके, अशोक मुर्तडक , अनंता सुर्यवंशी रतनकुमार इचम ,शशी पाटील , डॉ दीपक शेवाळे ,चेतन मैंद आदी 

googlenewsNext
ठळक मुद्दे तालुकाध्यक्ष शशी पाटील यांनी विधानसभा मतदार संघातील सध्या स्थितीतील आढावा सादर केला


कळवण: महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा कळवण विधानसभा मतदार संघातील गट अध्यक्ष व कार्यकर्ता मेळावा कळवण येथे संपन्न झाला.त्यावेळी मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव वसंत फडके उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक तर प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशी, रतनकुमार इचम आदी उपस्थित होते.
प्रारंभी मेळाव्यास उपस्थित मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष शशी पाटील व शहराध्यक्ष डॉ दीपक शेवाळे यांनी केले.
मेळाव्यात मार्गदर्शन करतांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस फडके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पंचसूत्री दिली. संवाद, सहकार्य, सातत्य, समन्वय आण िसंपर्क या माध्यमातून मतदारांशी संबंध वाढविण्याचे फडके यांनी यावेळी सांगितले. यावेळी अशोक मुर्तडक व अनंता सुर्यवंशी यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.
कळवण विधानसभा मतदार संघातील कळवण व सुरगाणा तालुक्यातील गट अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मनसेचे तालुका उपाध्यक्ष चेतन मैंद, उमेश भास्कर, निलेश शिंदे,रामदास आहेर,राजू मोरे, राकेश कुमावत,सुरज पगार,चेतन पगार, केदा गंवादे , संदीप पवार,गौतम जाधव , गणेश आहेर,उदय पिंगळे, अक्षय परदेशी, सनी पगार आदीसह उपस्थित होते.
--

Web Title:   MNS activists rally rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.