चिनी उत्पादनांच्या जाहिरांतींविरोधात मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:15 PM2020-06-25T23:15:58+5:302020-06-25T23:17:16+5:30

नाशिक : भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.

MNS aggressive against advertisements of Chinese products | चिनी उत्पादनांच्या जाहिरांतींविरोधात मनसे आक्रमक

चिनी उत्पादनांच्या जाहिरांतींविरोधात मनसे आक्रमक

Next
ठळक मुद्देसर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोषाची भावना

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.
भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केल्याने या हल्ल्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. चीनच्या या आगळीकीने देश व राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोषाची भावना व्यक्त होत असून, याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त गमे यांची भेट घेऊन नाशिक शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहिराती व फलक त्वरित काढण्यात याव्यात यासाठी निवेदने सादर केले. यावेळी मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हा सरचिटणीस अक्षय कोंबडे, जिल्हा सचिव संदेश जगताप उपस्थित होते.

Web Title: MNS aggressive against advertisements of Chinese products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.