शिंदे टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:15 AM2021-09-18T04:15:14+5:302021-09-18T04:15:14+5:30
नाशिकरोड : नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा ते सिन्नरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठ दिवसात जवळपास ...
नाशिकरोड : नाशिक - पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा ते सिन्नरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठ दिवसात जवळपास सहा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक - सिन्नर टोलवेज कंपनीविरोधात गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घोषणा देत आंदोलन केले तसेच वाहनधारकांसाठी टोल फ्री करत मराठी भाषिकांना नोकरीत सामावून घेतानाच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, अशी मागणी करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकरोड - सिन्नर फाटा ते चेहेडीपर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण आहे आणि दुसऱ्या बाजूला टोल वसुलीचा दणकादेखील सुरुच असून, चेहेडी ते शिंदे या दरम्यानच्या रस्त्यावर आजपर्यंत अनेकांना वाहन चालवताना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीतही टोल प्रशासन ढिम्म आहे. त्याविरोधात मनसे आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी (दि. १७) टोलचे व्यवस्थापक दीपक वैद्य यांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष अंकुश पवार, तालुकाध्यक्ष सुनील गायधनी, विक्रम कदम, रोहन देशपांडे, नितीन काळे, साहेबराव खर्जूल, गोकुळ नागरे, ईश्वर गायखे, शरद ढमाले, गणेश घनदाट, शरद गायधनी, हर्षद गायधनी, उमेश गायधनी, केशव धात्रक, कृष्णा जाधव, विशाल गायधनी आदी सहभागी झाले होते.
(फोटो १७ मनसे)
फोटो
नाशिक - सिन्नर टोलवेज कंपनीचे अधिकारी दीपक वैद्य यांच्याशी मनसेचे अंकुश पवार, सुनील गायधनी, विक्रम कदम, रोहन देशपांडे, ईश्वर गायखे आदींनी चर्चा केली.