नाशिकचा ऑक्सिजन हब नष्ट करण्यास राज ठाकरे यांचा विरोध, मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक
By संजय पाठक | Published: March 24, 2023 01:26 PM2023-03-24T13:26:39+5:302023-03-24T13:27:00+5:30
उद्या अधिकृत घोषणा करणार
नाशिकचा ऑक्सिजन हब मानल्या जाणाऱ्या पांझरापोळ येथे सुमारे अडीच लाख झाडे असून ते नष्ट करून त्या ठिकाणी उद्योगांसाठी जागा आरक्षित करण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. सध्या नाशिकमध्ये पांझरापोळ सुमारे साडे आठशे एकर
जागा उद्योगासाठी देण्याच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. या जागेवर अडीच लाख झाडे असून गो शाळेत दीड हजार पशुधन आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी नाशिकचे मनसेचे शहर प्रमुख दिलीप दातीर ज्येष्ठ नगरसेवक सलीममामा शेख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची कृष्णकुंजवर बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली आणि कुठल्याही परिस्थितीत वनसंपदा नष्ट करण्यास विरोध राहील असे स्पष्ट केले. यासंदर्भात नाशिकचे पदाधिकारी उद्या नाशिक येथे अधिकृत भूमिका घोषित करणार आहे