घोटी टोलनाक्यावर फास्टटॅग मधून स्थानिक वाहनांना वगळा मनसेची मागणी : तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:50+5:302021-02-11T04:15:50+5:30
घोटी येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर टोलनाक्यावर कर आकारणी केली जाते. दरम्यान, केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत ...
घोटी येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर टोलनाक्यावर कर आकारणी केली जाते. दरम्यान, केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत फास्टटॅग सक्तीचे केले आहे. या निर्णयामुळे स्थानिक वाहनांवर अन्याय होणार आहे. २-४ किमीसाठी हा फास्ट टॅग अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक वाहनचालकात नाराजीचा सूर आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन फास्टटॅगमधून स्थानिक वाहनांना वगळण्यात यावे. स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र दोन लेन उपलब्ध करून द्याव्यात अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी उपाध्यक्ष संजय सहाणे, रामदास चव्हाण,सरपंच रामदास आडोळे,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, हरिश चव्हाण, मनविसे विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, ईगतपुरी शहराध्यक्ष सुमित बोधक, कुष्णा भगत,भगवान कौटेसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.