खासगी रूग्णालयात प्रसुती दरम्यान महिला मृत्यू झाल्याने मनपाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 06:47 PM2019-02-15T18:47:03+5:302019-02-15T18:50:47+5:30
नाशिक : पंचवटीतील शिवनगर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, संबंधित महिलेच्या पतीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे धाव घेत संशयास्पद माता मृत्यूची चौकशीची मागणी केली. महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली शहर कार्यक्षेत्रात होणाºया माता मृत्यूची चौकशी करण्याचे अधिकार असून, आता या समितीने चौकशी सुरू केली असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी शुक्रवारी (दि.१५) महापालिकेत आयोजित आरोग्य वैद्यकीय समितीच्या बैठकीत दिली.

महापालिकेच्या सभागृहात सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी सभापतींनी याबाबत प्रशासनाला विचार केली होती. शिवनगर येथील नीलिमा राजेश जाधव या मातेला दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्यादरम्यान प्रसूतीकळा सुरू झाल्यामुळे नाशिकरोडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधारण सकाळी ९ वाजता तिने दुस-याही स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. त्यावेळी डॉक्टरांनी माता व मुलगी दोघेही सुखरूप असल्याचे सांगितल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. त्यानंतर मुलीला नातेवाइकांना बघण्यासाठीही दिले मात्र पत्नी लवकरच भुलीतून शुद्धीवर येईल, असे सांगत भेटण्यास मनाई केली. त्यानंतर काही काळातच डॉक्टरांनी प्रकृती खराब झाल्याचे सांगितल्यामुळे धक्का बसला. काही वेळात तर डॉक्टरांनी वाचण्याची शक्यता कमी आहे. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत आहे, असे सांगत अन्य मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास संबंधित रुग्णालयात नीलिमा हिचा मृत्यू झाला. या प्रकरणात रुग्णालयाचा हलगर्जीपणा झाला असून, दोषी अधिका-यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
रुग्णालयातील आयपीडी पेपरवरून नीलिमा ही प्रसूतीनंतरही किंबहुना भूल देण्यापूर्वी व्यवस्थित होती, असे पती जाधव यांनी गमे यांना सांगितले. तिचे हिमोग्लोबीन, रक्तदाब व हृदयाचे ठोकेही व्यवस्थित असल्याचे नमूद करीत संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची कागदपत्रे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड यांनी ताब्यात घेतली असून, माता मृत्यू समितीमार्फत चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. जाधव यांनी भुलीच्या ओव्हरडोसमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे, त्याबाबत कुलकर्णी यांनी समितीच्या बैठकीत करवाईबाबत विचारणा केली होती.