खासगी शिक्षण संस्थांना मनसेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:48+5:302020-12-12T04:31:48+5:30

यासंदर्भात शिक्षण उप-संचालक नितीन उपासनी यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, पैशांअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू ...

MNS opposes private educational institutions | खासगी शिक्षण संस्थांना मनसेचा विरोध

खासगी शिक्षण संस्थांना मनसेचा विरोध

googlenewsNext

यासंदर्भात शिक्षण उप-संचालक नितीन उपासनी यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, पैशांअभावी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असा सरकारचा आदेश असतानाही काही शाळा फीसाठी तगादा लावत आहेत. खासगी शिक्षण संस्था इतर वेळी भरमसाठ फी घेतात; पण कोरोना काळातही फीसाठी पालकांकडे तगादा लावत आहे. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. शाळा बंद असली तरी शिक्षकांचा पगार सोडून इतर कोणताही खर्च नसताना शाळा ऑनलाइन क्लासच्या नावाखाली प्रत्येकांकडुन संपूर्ण फीसाठी पालकांवर दबाव आणला जात आहे. फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसमधून काढून टाकण्यात येणार असून, ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही त्यांनी फी भरावी, असा इशारा देण्यात येत आहे. अशा शाळांचे मागील सर्व रेकॉर्ड तपासून गैरव्यवहार करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मनविसेचे नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुणे, शशिकांत चौधरी, उमेश भोई, भाऊसाहेब ठाकरे, रंजन पगारे, गुड्डू शेख, स्वप्नील विभांडीक, जोगित पिल्ले आदींंच्या सह्या आहेत. (फोटो ११ मनसे)

Web Title: MNS opposes private educational institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.