भोजापूर धरणातून आवर्तन सोडण्यास मनसेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:42 PM2018-11-28T17:42:53+5:302018-11-28T17:43:07+5:30
सिन्नर : तालुक्यात यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता व भविष्याची गरज ओळखून पाण्याचा वापर करावा यासाठी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले भोजापूर धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडण्याची मागणी तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेना व चापडगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिन्नर : तालुक्यात यंदा पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची उपलब्धता व भविष्याची गरज ओळखून पाण्याचा वापर करावा यासाठी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले भोजापूर धरणातील पाण्याचे आवर्तन न सोडण्याची मागणी तालुका महाराष्टÑ नवनिर्माण सेना व चापडगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भोजापूर धरणातून पाणी सोडण्यास विरोध असल्याचे निवेदन तहसीलदार नितीन गवळी यांना देण्यात आले.
तालुक्यात १९७२ च्या दुष्काळापेक्षा अतिशय भयावह दुष्काळाच्या झळा बसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. येणाºया काळात त्याचा परिणाम गंभीर होणार असल्याने भोजापूर धरणारच्या पाण्यावर तालुक्याच्या नजरा आहे. त्यामुळे धरणातील शिल्लक असलेला पाणीसाठी भविष्यसाठी जपून ठेवण्याची मागणी मनसेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने रब्बी पिकांची पेरणी होवू शकत नाही. १२ दिवसाच्या पाण्याच्या आवर्तनाने कोणत्याही शेतकºयाचा फायदा होणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा-पाण्याची सोय नसतांना देवू केलेल्या पाण्याचे आवर्तन सोडून कोणाला फायदा होणार तसेच हे पाणी टॅँकर आणि पेयजल योजनेतून पुरविल्यास संपूर्ण तालुक्याला पुढील सहा महिने उपयोगात येवू शकते असे निवेदानात म्हटले आहे. काही राजकीय नेत्यांनी भविष्याचा विचार न करता आवर्तन सोडण्याची निर्णय घेतला आहे. जरी आवर्तन सोडले तर भविष्यात दुष्काळाची स्थिती अधिक भयावह होणार असल्याने तहसीलदार गवळी यांनी स्वत: लक्ष घालून योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.