मनसैनिकांनी बसेसवर लावले ह्यछत्रपती संभाजीनगरह्णचे फलक आंदोलन - औरंगाबाद नामांतराच्या मागणीसाठी मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:15 PM2021-01-02T18:15:35+5:302021-01-03T00:48:02+5:30
नाशिक : औरंगाबादचे नाव बदला अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नाशिकहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसवर ह्यछत्रपती संभाजीनगरह्ण असे फलक लावून २६ जानेवारीपर्यंत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
नाशिक : औरंगाबादचे नाव बदला अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नाशिकहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसवर ह्यछत्रपती संभाजीनगरह्ण असे फलक लावून २६ जानेवारीपर्यंत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी दुपारी अचानकपणे हे आंदोलन केल्याने नवीन सीबीएस परिसरात मोठीच चर्चा रंगली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसांवर ह्यछत्रपती संभाजीनगरह्ण असे फलक चिकटवून अभिनव आंदोलन केले. राज्यशासनातील सत्ताधारी शिवसेनेने नुकतेच औरंगाबादमध्ये सुपर संभाजीनगर असे फलक झळकवल्यानंतर या विषयाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीस त्यांचे नाव देण्यात यावे अशी राज्यातील जनतेची भावना असून तशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष अंकुश पवार, मनोज घोडके, भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, संतोष कोरडे, संजय देवरे, अमित गांगुर्डे, निखील सरपोतदार, किशोर वडजे, नितीन माळी, अर्जुन वेताळ, चंद्रभान ताजनपुरे, गोकुळ नागरे, साहेबराव खर्जुल, सुनील पाटोळे, शाम गोहाड, संदेश जगताप, सिद्धेश सानप, अक्षय कोंबडे, दत्तात्रय इंगळे आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.