महिंद्राच्या प्रवेशद्वारावरच मनसे पदाधिकाऱ्यांना रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:54+5:302021-07-03T04:10:54+5:30
कंपनीत कंत्राटी पद्धतीने सुमारे दोनशे स्थानिक कामगार तुटपुंजा पगारावर काम करत आहेत. या कामगारांना कामगार कायद्यानुसार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची ...
कंपनीत कंत्राटी पद्धतीने सुमारे दोनशे स्थानिक कामगार तुटपुंजा पगारावर काम करत आहेत. या कामगारांना कामगार कायद्यानुसार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील महिन्यात १४ दिवस कामबंद आंदोलन केले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांनी यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून या कामगारांना कामावर घेण्यास भाग पाडले. या चर्चेदरम्यान कंपनी व्यवस्थापनाने मागील १० ते १५ वर्षांपासून कामगारांचा थकीत असलेला प्रोव्हिडंट फंड देण्याचे मान्य करत २ जुलैपर्यंत वेळ मागितला होता. यासाठी २ जुलै रोजी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे चर्चेसाठी गेले असता त्यांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. याठिकाणी कंपनीने पोलीस बंदोबस्त लावला होता. याप्रसंगी सरचिटणीस सचिन गोळे, चिटणीस परशुराम साळवे, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष मूलचंद भगत, शहराध्यक्ष सुमित बोधक, राज जावरे आदींची उपस्थिती होती.
इन्फो
राज ठाकरेंशी बोलणार
सचिन गोळे महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करण्यास कंपनी गेटवर जात असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस पथकाने त्यांना अडवून कंपनीच्या आत जाण्यास मज्जाव केला. यावेळी सचिन गोळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर बोलून कामगारांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन कामगारांना दिले.
फोटो- ०२ महिंद्रा कंपनी
महिंद्रा कंपनीच्या प्रवेशद्वारावर मनसेचे सचिन गोळे, दिलीप दातीर, संदीप किर्वे यांना अडवण्यात आले.
020721\02nsk_34_02072021_13.jpg
फोटो- ०२ महिंद्रा कंपनी महिंद्रा कंपनीच्या प्रवेशद्वारावर मनसेचे सचिन गोळे, दिलीप दातीर, संदीप किर्वे यांना अडवण्यात आले.