जनतेची लूट न थांबल्यास मनसेचा जनआंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 03:35 PM2020-07-13T15:35:05+5:302020-07-13T15:36:07+5:30
कोरोनाचा प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा आणि मनपा प्रशासन कमी पडल्याने रु ग्णसंख्या वाढत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच खासगी रुग्णालयांमधून होत असलेली जनतेची लूट प्रशासनाने न थांबवल्यास मनसे तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा आणि मनपा प्रशासन कमी पडल्याने रु ग्णसंख्या वाढत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच खासगी रुग्णालयांमधून होत असलेली जनतेची लूट प्रशासनाने न थांबवल्यास मनसे तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रु ग्णसंख्येवर मनसेने आक्र मक पवित्रा घेतला असून, जिल्हा आणि मनपा प्रशासनावर मनसेने कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. कोरोनाबाबत जिल्ह्यात सर्वच पातळीवर समन्वयाचा अभाव असून दिवसागणिक शहरात कोरोनाचे रु ग्ण वाढत आहेत. त्यावर प्रशासनाने तातडीने नियंत्रण मिळविणे आवश्यक असून, तसे न आणल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या महामारीतही औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणी मनसेने पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, प्रवक्ता पराग शिंत्रे उपस्थित होते.
खासगी हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे होणारी लूट थांबवावी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना बाधित रु ग्णांना खासगी रु ग्णालयात मोफत उपचार देण्यात यावे, शासकीय नियमानुसार खासगी हॉस्पिटलमध्ये २० टक्के खाटा आरक्षित कराव्या, इंजेक्शन, औषधे, आॅक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, सॅनिटायझर यांचे दर सर्वसामान्यांना परवडतील असे करण्यात यावे या मनसेच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांची शासन आणि प्रशासनाकडून त्वरित पूर्तता करण्यात यावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.