'त्या' दत्तक गावासाठी मनसैनिक धावले, दुष्काळात पाणीपुरवठा करण्याचा 'राज्यादेश'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 09:15 PM2019-05-01T21:15:04+5:302019-05-01T21:16:06+5:30
र्डेवाडी (खोडाला) गावातील महिला ज्याप्रमाणे पाण्यासाठी वणवण फिरतायंत.
नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीनाशिकच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाची पोलखोल केली होती. 26 एप्रिल रोज नाशिक येथील सभेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी (खोडाला) या गावातील दुष्काळाचे वास्तव दाखवले. त्या गावातील दुष्काळ निवारणासाठी मनसे पुढे सरसावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार या गावाला पाण्याचे टाक्या आणि टँकर पुरविण्यात येत आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनापासून या कामाला सुरुवात झाली आहे.
बर्डेवाडी (खोडाला) गावातील महिला ज्याप्रमाणे पाण्यासाठी वणवण फिरतायंत. जीव धोक्यात घालून विहिरीतून हंडाभर पाणी काढत असतानचे व्हिडीओ राज यांनी आपल्या सभेत दाखवले होते. या गावातील दुष्काळ दाखवत राज यांनी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका केली. मात्र, राज केवळ टीका करुन थांबले नाहीत. तर, भाजपाकडून होणाऱ्या टीकेलाही मनसेनं सणसणीत उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी दादरमधील शिवाजी पार्कमध्ये एकतरी झाड लावलं का? असा प्रश्न मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी विचारला होता.
राज ठाकरेंनी मंगळवारी मनसे सरचिरणीस आणि कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांना आदेश देऊन त्या गावामध्ये पाण्याच्या 2 हजार लिटर पाण्याच्या टाक्या बसविण्यात सांगितले. तसेच, सदर गावामध्ये 1 मे 2019 पासून पाऊस पडे पर्यंत पाण्याचे टँकर्स द्यावे, असे आदेशही राज यांनी दिले आहेत. त्यानुसार, मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्याकडुन गावात पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या असून उद्यापासून टँकर्सनेही पाणीही पुरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पावसाळा येईपर्यंत ही सेवा गावतील महिला भगिनींसाठी देण्यात येत आहे.
राजसाहेबांच्या नाशिकच्या सभेत त्र्यंबकेश्वरच्या बर्डेवाडी ह्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील पाण्याचे दुर्भिक्ष, माता-भगिनींची ससेहोलपट पाहिली.
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) May 1, 2019
आता मनसेच्या मनोज चव्हाणांच्या पुढाकाराने 'त्या' गावाला १ मे पासून ते पाऊस पडेपर्यंत २००० ली. पाण्याच्या टाक्यांचा पुरवठा. pic.twitter.com/kSuIbJWnof