करवाढीविरोधात मनसेची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:54 AM2018-02-24T00:54:22+5:302018-02-24T00:54:22+5:30
महापालिकेने घरपट्टीत ३३ टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने गांधीनगर येथील घरपट्टी उपकार्यालयासमोर केक कापून गांधीगिरी पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
उपनगर : महापालिकेने घरपट्टीत ३३ टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने गांधीनगर येथील घरपट्टी उपकार्यालयासमोर केक कापून गांधीगिरी पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. मनपाच्या नुकत्याच झालेल्या महासभेत घरपट्टीत ३३ टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर करवाढ ही सर्वसामान्यांवर अन्यायकारक असून, केलेली करवाढ मागे घेण्यात यावी याकरिता मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांधीनगर येथील मनपाच्या घरपट्टी उपकार्यालयाबाहेर गुरुवारी केक कापून गांधीगिरी पद्धतीने निषेध आंदोलन केले. मनपाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी केक कापून मनपा कर्मचाºयांनादेखील वाटला. यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष नितीन साळवे, शहर चिटणीस नीलेश सहाणे, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, संजय जोशी, राहुल शिंपी, विक्की राजपूत, राहुल गवारे, हेमंत फापाळे, कृष्णा नागरे, सोनू स्वामी, विशाल पिल्ले, संकेत शेजवळ, स्वप्निल आहिरे आदी उपस्थित होते.