महिलेचा विनयभंग करत टोळक्याने पती-दीरावर चढविला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:12 AM2021-01-18T04:12:59+5:302021-01-18T04:12:59+5:30

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गरीब नवाज कॉलनीमधील पीडितेच्या घरावर रात्रीच्या सुमारास संशयित इम्रान शहा, सद्दाम शहा (रा. वडाळागाव ) ...

The mob attacked the husband and wife, molesting the woman | महिलेचा विनयभंग करत टोळक्याने पती-दीरावर चढविला हल्ला

महिलेचा विनयभंग करत टोळक्याने पती-दीरावर चढविला हल्ला

Next

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गरीब नवाज कॉलनीमधील पीडितेच्या घरावर रात्रीच्या सुमारास संशयित इम्रान शहा, सद्दाम शहा (रा. वडाळागाव ) बाल्या (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांंनी तिच्या पती व दिराला घराबाहेर काही कारणाने बोलावून घेतले आणि मारहाण सुरू केली. यावेळी पीडित महिला त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आली असता या संशयितांनी तिच्या अंगावरील कपडे ओढत स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होइल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिघा संशयितांविरुद्ध पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या पतीला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेपासून संशयित हल्लेखोर वडाळागाव परिसरातून फरार झाले असून, इंदिरानगर पोलीस त्यांचा शोध घेत आहे; मात्र तिघांपैकी एकही संशयित पोलिसांना अद्याप मिळून आलेला नाही.

--इन्फो--

कॉलनीमधील रहिवाशांमध्ये दहशत

कॉलनी परिसरात अचानकपणे झालेल्या मारहाणीच्या या घटनेने कायदा सुव्यवस्थाही धोक्यात आली. तसेच सार्वजनिक शांततेचाही संशयित हल्लेखोरांच्या टोळक्याने भंग केला. मागील काही दिवसांपासून या कॉलनीच्या परिसरात गुंडप्रवृत्तीच्या मद्यपी समाजकंटकांचा वावर वाढला असून, संध्याकाळी तसेच मध्यरात्री सार्वजनिकरीत्या उघड्यावर गुंडप्रवृत्तीचे टारगट मुले ‘ओली पार्टी’ रंगवित असल्याचीही तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. या गुंडप्रवृत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदिरानगर पोलिसांनी कॉलनीमध्ये नियमितपणे गस्त करून टारगट गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.

Web Title: The mob attacked the husband and wife, molesting the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.