सव्वा लाख रुपयांचे मोबाइल मूळ मालकांना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:04+5:302021-02-23T04:23:04+5:30
गहाळ झालेले मोबाइल शोधण्यासाठी पंचवटी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेत वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल शोधून ते मूळ मालकांना परत ...
गहाळ झालेले मोबाइल शोधण्यासाठी पंचवटी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेत वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. गहाळ झालेले मोबाइल मूळ मालकांना परत करण्याची पाहिलीच वेळ असून ज्या नागरिकांचे मोबाइल गहाळ झाले होते त्यांनी सदर मोबाइल गहाळ झाल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गहाळ झालेले मोबाइल शोधण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाची मदत घेत सदरचे मोबाइल कार्ड बदलून त्यात अन्य कार्ड टाकून त्याचा वापर करणाऱ्यांचा शोध घेतला व मोबाइल ताब्यात घेऊन मूळ मालकांना परत केले.
---
---इन्फो बॉक्स--
मोबाइल चोरी झाली तरी गहाळचीच तक्रार?
बाजारपेठेत भाजीपाला खरेदीसाठी किंवा मंदिराच्या ठिकाणी देवदर्शनासाठी आल्यानंतर नागरिकांच्या खिशातील मोबाइल फोन अलगद काढून घेतात. मोबाइल चोरी झाल्यानंतर संबंधित नागरिक पोलीस ठाण्यात जातात, मात्र पोलीस त्या ठिकाणी मोबाइल चोरी झाल्याची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी एका कागदावर स्वाक्षरीने मोबाइल गहाळ झाल्याबाबत तक्रार देण्यास भाग पाडतात, हे पोलिसांच्या कामकाजावरून स्पष्ट झाले आहे.