मोबाईल चोरट्यास शिताफीने अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:51 AM2020-03-09T11:51:47+5:302020-03-09T11:53:02+5:30

लासलगाव : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास लासलगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. निशीकांत रमेश अहिरे (वय २२ वर्षे रा . चंदनवाडी टाकळी विंचुर ता निफाड) यास लासलगाव पोलिसांनी पाच मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी ताब्यात घेवून अटक केल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.

 Mobile Choratis arrested | मोबाईल चोरट्यास शिताफीने अटक

मोबाईल चोरट्यास शिताफीने अटक

Next

लासलगाव : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास लासलगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. निशीकांत रमेश अहिरे (वय २२ वर्षे रा . चंदनवाडी टाकळी विंचुर ता निफाड) यास लासलगाव पोलिसांनी पाच मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी ताब्यात घेवून अटक केल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की दि.३ मार्च रोजी लासलगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी न कु . अश्विनी सुभाष कुटे रा . पिंपळगाव निजक यांचे फिर्यादीवरून जबरी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे करीत होते . सदर गुन्हयाचा तपासाबाबत पोलीस अधिक्षक डॉ . आरती सिंह , अतिरिक्त. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर , पोलीस उपअधीक्षक माधव रेडडी यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे गुप्त बातमीदारामार्फत मिळलेल्या माहितीनुसार पथक तयार करून सदर पथकाने रेल्वे स्टेशन रोड लासलगाव ते टाकळी विंचुर रस्त्यावर सापळा रचुन संशयित निशिकांत अहिरे यास ताब्यात घेतले. सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्याचेकडे गुन्हयातील पाच मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी करता त्यांने लासलगाव शहरातुन जबरी मोबाईल चोरी केली असलेबाबत कबुली दिली आहे . आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे .

Web Title:  Mobile Choratis arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक