मोबाइल खेचणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:46 PM2018-11-21T23:46:12+5:302018-11-22T00:16:29+5:30

रेल्वेच्या दरवाजाजवळ मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाचा बळजबरीने मोबाइल हिसकावून नेणारा आरोपी सागर ऊर्फ आकाश विलास जाधव (२३, रा़ तुळजाभवानी मंदिराजवळ, नांदूर नाका, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील रवींद्र निकम यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़

Mobile extorted accused accused | मोबाइल खेचणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

मोबाइल खेचणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

Next

नाशिक : रेल्वेच्या दरवाजाजवळ मोबाइलवर बोलत असलेल्या तरुणाचा बळजबरीने मोबाइल हिसकावून नेणारा आरोपी सागर ऊर्फ आकाश विलास जाधव (२३, रा़ तुळजाभवानी मंदिराजवळ, नांदूर नाका, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील रवींद्र निकम यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़
ठाणे येथील वाचळेनगरमधील रहिवासी मनोज सोनवणे (२१) या विद्यार्थ्याची औरंगाबादला परीक्षा होती़ या परीक्षेसाठी ११ फेब्रुवारी २०१६ रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये कल्याण येथून बसला़ रेल्वे नाशिकरोड रेल्वेस्थानकातून सुटल्यानंतर हायवे ओव्हरब्रिजजवळ रेल्वेच्या दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलत असलेल्या मनोजच हातास झटका देऊन आरोपी आकाश जाधव याने मोबाइल
हिसकावला़ यामध्ये ते रेल्वेतून खाली पडल्याने डोक्यास व कपाळावर जखम तसेच हात फॅक्चर झाला होता़ या प्रकरणी आरोपी जाधव याच्या विरोधात नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़  जिल्हा व सत्र न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रवींद्र निकम यांनी पाच साक्षीदार तपासून दोषारोप सिद्ध केले़ न्यायाधीश गिमेकर यांनी आरोपी जाधव यास सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

Web Title: Mobile extorted accused accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.