अज्ञात चोरट्यांकडून मोबाइल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:18+5:302021-07-05T04:10:18+5:30
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव नांदूरशिंगोटे : जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव ...
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव
नांदूरशिंगोटे : जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कोविडकाळात येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना अहोरात्र सेवा दिली आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के यांचा योगेश आव्हाड व सोनेवाडीचे माजी सरपंच कैलास सहाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मोकाट जनावरांचा उच्छाद
नांदूरशिंगोटे : येथे गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर, गल्लोगल्ली मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. याचा लहान मुले, महिला, वृद्धांना त्रास होत आहे. रात्री, दिवसा मोकाट जनावरे रस्त्यावरच बसलेली असतात. याचा वाहनचालकांनाही त्रास होतो. अनेकवेळा वाहतुकीसही अडथळा होतो. तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ट्रॅक्टरद्वारे पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल
नांदूरशिंगोटे : यंदाच्या हंगामात पाऊस वेळेवर झाला. पण तो सर्वत्र समान पडला नाही. शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली. पेरण्यांना विलंब होत असल्यामुळे आता शेतकरीही ट्रॅक्टरद्वारे पेरण्या करताना दिसत आहेत, तर ट्रॅक्टरमध्ये खते - बी प्रमाणात टाकण्याची सुविधा असल्याने शेतकरी चिंतामुक्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या उरकल्या असून, पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.
दापूर-चापडगाव रस्त्यावर खड्डे
नांदूरशिंगोटे : सिन्नर व अकोला या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या दापूर ते चापडगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परिसरातील शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव रस्ता असल्याने नेहमीच वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहतूक सुरू असल्याने खड्ड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते.
घरगुती गॅसच्या दरात वाढ
नांदूरशिंगोटे : घरगुती गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापासून सलग तीन महिने गॅसचा दर स्थिर होता. मात्र आता पुन्हा केंद्र सरकारने गॅसचा दर वाढवला आहे. गॅसचा आता ८४० रुपये प्रतिसिलिंडर एवढा दर आहे. कोरोनाच्या काळात घरगुती इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेंबरमध्ये ६०० रुपयांना मिळणारा १४ किलोचे एक सिलिंडर आता ८४० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे गृहिणींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.