विल्होळी परिसरात नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:08 PM2020-09-18T19:08:30+5:302020-09-18T19:10:58+5:30
विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अॅप वापर करताना न येणे, इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबाईल धारकांनी संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे रिचार्ज चा दर वाढत असताना दुसरीकडे नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागतो. सर्व कंपन्यांचे प्लॅन हे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक असल्यामुळे दिवस तर संपत आहे, परंतु सेवेचा लाभ घेता येत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इंटरनेट बंद असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरता येत नाही, ना कुठलेही प्रवेश पत्र डाऊनलोड करता येत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा, पदवी परीक्षा, सह शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नेटवर्क शोधासाठी दूरवर कुठेतरी उंचावर जावे लागते. गावात सुरू असलेल्या बँका, कार्यालय मधील इंटरनेट, एटीएम सेवा यांचा बोजवारा उडाला आहे.
यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याने कर्मचारी व नागरीकांमध्ये वाद होत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनिदन व्यवहार ठप्प झाले. संबंधित कंपन्यांनी नेटवर्क तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मोबाईलधारकांनी कडून केली जात आहे.