आरोग्य सेवकांना अश्लील व्हिडिओ असलेले मोबाइल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:03 AM2019-03-09T01:03:31+5:302019-03-09T01:03:50+5:30
केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाच्या कार्यक्रमाअंर्तगत नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मोबाइल अॅपमध्ये चक्कअश्लील चित्रफिती आढळल्या असून, त्यामुळेच शहरात खळबळ उडाली आहे. एका एनजीओमार्फत प्रशिक्षण देताना हा प्रकार आढळल्यानंतर हे मोबाइल जमा करण्यात आले असले तरी त्यावरून वातावरण पेटले आहे.
नाशिक : केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाच्या कार्यक्रमाअंर्तगत नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मोबाइल अॅपमध्ये चक्कअश्लील चित्रफिती आढळल्या असून, त्यामुळेच शहरात खळबळ उडाली आहे. एका एनजीओमार्फत प्रशिक्षण देताना हा प्रकार आढळल्यानंतर हे मोबाइल जमा करण्यात आले असले तरी त्यावरून वातावरण पेटले आहे. राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने महापालिकेसमोर निदर्शने करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली, तर महापौर रंजना भानसी यांनी तातडीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने देशभरात इलेक्ट्रिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क करण्यात येत असून, त्यासाठी एक विशेष अॅप तयार करण्यात आले आहे. लसीकरणात एक शीत साखळी राखणे आवश्यक असते. त्यासंदर्भातील हे अॅप असून, त्यासाठी नाशिक महापालिका आणि मालेगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण एका खासगी हॉटेलमध्ये देण्यात येत होते. आयोजकांच्या वतीने संबंधित कर्मचाऱ्यांना मोबाइलचे वाटप करण्यात आले आणि ते अॅक्टिव्हेट करण्यास सांगण्यात आले त्यानंतर अॅप कसे डाउनलोड करायचे याबाबत माहिती दिली जाणार होती, परंतु काहींनी मोबाइल उघडल्यानंतर त्यात तीस ते पस्तीस अश्लील व्हिडिओ क्लिप आणि फोटो आढळल्याचे निदर्शनास येताच तातडीने मोबाइल परत घेण्यात आले. त्यासाठी तांत्रिक कारण देण्यात आले होते, परंतु या प्रकारानंतर मात्र शहरात संतापाची लाट आली आहे. महापालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्लील चित्रफित अश्लील छायाचित्र आढळल्याने याचा निषेध व्यक्त करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी डॉ. शेफाली भुजबळ यांच्या उपस्थितीत महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. अश्लील चित्रफित प्रकरणी अधिकाºयांवर कारवाई करा, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
अश्लाघ्य आणि घोटाळाही
महापालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्लील चित्रफित आणि अश्लील छायाचित्र आढळले आहे. प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या या नवीन स्मार्ट फोनमध्ये अश्लील चित्रफित आणि छायाचित्र असणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. प्रशासनाने नव्या मोबाइलमध्ये तीस ते पस्तीस फोटो व्हिडीओ क्लिप असल्याने हे याबाबत तांत्रिक कारण देत मोबाइल पुन्हा जमा करून घेण्यात आले असले तरी या घडलेल्या या घृणास्पद प्रकरणाची चौकशी करून सबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्टÑवादीने केली.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
महापालिकेच्या प्रशिक्षण शिबिरात हा प्रकार घडल्याने महापौर रंजना भानसी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाची पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. सदरचे प्रकरण अत्यंत गांभीर असून, त्या मागे कोण आहे, या सूत्रधारांचा शोध घ्यावा, अशी मागणीही भानसी यांनी केली आहे.