मोबाईल रिचार्ज दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 04:11 PM2020-02-28T16:11:25+5:302020-02-28T16:11:47+5:30

कुकाणे : संपूर्ण देशात आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक आठवणी टाकले आहे. सामान्य जनतेकडे मोबाईल कनेक्शन आहे. लोकांकडे बोलण्याचा बॅलन्स नसतो परंतु इंटरनेटचा बॅलन्स असतोच यापूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी ३५ रूपयाचा रिचार्ज प्रत्येक २८ दिवसांसाठी केला.

Mobile recharge hike hits the public | मोबाईल रिचार्ज दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

मोबाईल रिचार्ज दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

Next

कुकाणे : संपूर्ण देशात आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक आठवणी टाकले आहे. सामान्य जनतेकडे मोबाईल कनेक्शन आहे. लोकांकडे बोलण्याचा बॅलन्स नसतो परंतु इंटरनेटचा बॅलन्स असतोच यापूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी ३५ रूपयाचा रिचार्ज प्रत्येक २८ दिवसांसाठी केला. होता तोही रिचार्ज जनतेणे सहन करत आपला नंबर चालू ठेवला आहे. आताही रिचार्ज वाढवून पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना दणका दिला आहे हा रिचार्ज न केल्यास १५-१५ दिवसांच्या अंतराने कॉल करणे व घेणेही बंद होणार असल्याचे टेलिकॉम क्षेत्रातून ग्राहकांना सांगण्यात येत आहे.
आज प्रत्येकाला मोबाईलचे महत्त्वाचा झाला आहे. एक वेळ जेवण नसले तरी चालेल पण मोबाईल व त्याचा रिचार्ज लागतोच. अगदी फोन नाही आला तरीही माणूस फोन खिशातून काढून बघतोच इतका मोबाईल माणसासाठी अत्यावश्यक झाला आहे. सुरूवातीला कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे व्यसन लावल्यानंतर आता सर्वच कंपन्यांच्या रिचार्जमध्ये ४० ते ५० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक बजेट कोलमडत असून याचा मोठा फटका बसत आहे.

Web Title: Mobile recharge hike hits the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल