अंगणवाडी सेविकांची ‘मोबाइल वापसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:34+5:302021-09-27T04:15:34+5:30
बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीचे कामकाज दररोज ऑनलाईन पद्धतीने व्हावे यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला ४ एप्रिल २०१९ रोजी मोबाईल पुरविण्यात आले ...
बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीचे कामकाज दररोज ऑनलाईन पद्धतीने व्हावे यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला ४ एप्रिल २०१९ रोजी मोबाईल पुरविण्यात आले होते. हे भ्रमणध्वनी निकृष्ट दर्जाचे असून, कामकाज करताना हँग होणे, डाटा निघून जाणे, रेंज सोड-धर करणे अशा अनेक अडचणी येत असल्याने त्यातच नव्याने आलेले पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजीतून असल्याने त्यावर काम करणे अवघड जात आहे. याला कंटाळून मोबाईल परत केल्याचे अंगणवाडी सेविकांनी म्हटले आहे. दरम्यान, मोबाईल वापसी करताना प्रकल्पाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात नव्याने मोबाईल देण्यात येऊ नये. पूर्वीप्रमाणेच आम्ही रजिस्टरमध्ये माहितीची नोंदणी करू व वेळोवेळी कार्यालयास सादर करू, यासाठी पूर्वीप्रमाणेच काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर कुसुम राजभोज, चंद्रकला बत्तासे कौमुदी देवरे, अनिता देशमुख, अंजना वाघ, मीना राजभोज, सरला जाधव, आदींच्या सह्या आहेत.
फोटो - २६ अभोणा २
कळवण बालविकास विभागाकडे मोबाईल परत करण्यासाठी एकत्र आलेल्या अंगणवाडी सेविका.
260921\26nsk_28_26092021_13.jpg
कळवण बालविकास विभागाकडे मोबाइल परत करण्यासाठी एकत्र आलेल्या अंगणवाडी सेविका