चोरीच्या दुचाकींसह मोबाइल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:27 AM2018-12-25T00:27:03+5:302018-12-25T00:27:27+5:30
पुण्यासह नाशिकमधील विविध ठिकाणांहून दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकींसह दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़
नाशिक : पुण्यासह नाशिकमधील विविध ठिकाणांहून दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकींसह दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ प्रवीण ऊर्फ चाफा निंबाजी काळे (२०, रा. नाशिकरोड) व रोशन रामदास पवार (१९, रा. अंबड) अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत़ दुचाकी व मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या़ त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व पोलीस शिपाई प्रजीत ठाकूर, विशाल पाटील व अमोल टिळेकर यांना उपनगर पोलीस ठाण्यातील एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित दुचाकी विक्रीसाठी चव्हाण मळ्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचाºयांनी सापळा रचून काळे व पवार या दोघांना अटक केली़