वृक्षतोड राेखण्यासाठी फिरते पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:05+5:302021-01-25T04:16:05+5:30

.... यंदा मनपाचा पुष्पोत्सव रद्द नाशिक : तब्बल दहा वर्षांनंतर सुरू झालेला नाशिक महापालिकेचा पुष्पोत्सव यंदा बहरणार नाही. कोरोनाचे ...

Mobile squad for deforestation | वृक्षतोड राेखण्यासाठी फिरते पथक

वृक्षतोड राेखण्यासाठी फिरते पथक

Next

....

यंदा मनपाचा पुष्पोत्सव रद्द

नाशिक : तब्बल दहा वर्षांनंतर सुरू झालेला नाशिक महापालिकेचा पुष्पोत्सव यंदा बहरणार नाही. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले. बंद पडलेला पुष्पोत्सव आमले यांनीच सुरू केला होता. मात्र, यंदा कोरेानाचे संकट, त्यातच मनपाच्या उत्पन्नात झालेली घट यामुळे पुष्पोत्सव होऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

...

मनपा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी गेल्या ५ जानेवारीपासून कार्यवाही सुरू झाली असून, पदोन्नती झालेल्यांची अंतिम यादी येत्या २७ जानेवारीस महापालिकेत लावण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची उत्सुकता वाढली आहे. महापालिकेच्या आयुक्तपदी संजय खंदारे असताना पदोन्नती झाली. त्यानंतर मात्र अनेक वर्षांपासून काम रखडले होते. महासभा आणि स्थायी समितीत याबाबत मोठ्या प्रमाणात ओरड झाल्याने अखेरीस प्रशासनाने या कामाला चालना दिली आणि आयुक्त कैलास जाधव यांनी थेट पदोन्नतीच्या कार्यवाहीचा कार्यक्रमच घोषित केला. त्यानुसार आता कार्यवाही जवळपास पूर्ण झाली असून, २७ किंवा २८ जानेवारीस अंतिम यादी प्रसिद्ध हेाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Web Title: Mobile squad for deforestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.