मोबाइल हिसकावून पळ काढणारे त्रिकूट ताब्यात;१३ मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 06:45 PM2019-08-21T18:45:31+5:302019-08-21T18:47:14+5:30

या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता.

Mobile trio seized; | मोबाइल हिसकावून पळ काढणारे त्रिकूट ताब्यात;१३ मोबाइल जप्त

मोबाइल हिसकावून पळ काढणारे त्रिकूट ताब्यात;१३ मोबाइल जप्त

Next
ठळक मुद्देपोलिसांनी तपास करून तीघा संशयितांना ताब्यात घेतले.हिसकावून नेलेले १३ महागडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल जप्त केले

नाशिक : दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पळ करणाºया अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने छडा लावला. या टोळीमधील संशयित चोरटा अतीश विजय शहा (१९,रा.रामवाडी) यास अटक केली आहे. तसेच्या त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ४७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतीष हा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दुचाकीवर ट्रिपल सीट बसून वेगवेगळ्या परिसरात भटकंती करत दुचाकीवर बोलत जाणाºया किंवा पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळक काढत होते. या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. तसेच या त्रिकुटाने डीजीपीनगर ते आंबेडकरनगर सिग्नल दरम्यान सलीम कय्युम शेख (४९, रा. डीजीपीनगर-१) यांच्याकडील मोबाइल हिसकावून पोबारा केल्याचेही निष्पन्न झाले आहे. . या तीनही जबरी चोरीच्या घटनांबाबत मंगळवारी (दि.२०)संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास एक्सलो पाँइट जवळ तुषार सुधाकर खिल्लारी (२८, रा. अंबड) यांच्याकडील १५हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून तीघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यावेळी या तीघांनी मोबाइल हिसकावल्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हिसकावून नेलेले १३ महागडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचीन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Mobile trio seized;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.