नववसाहत भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:20 PM2020-01-03T22:20:47+5:302020-01-03T22:21:01+5:30

नववसाहत परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे अपघात होत आहेत. वृद्ध व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Mobilize animals in neonatal areas | नववसाहत भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

नववसाहत भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव : मनपाकडून जनावर मालकांवर कारवाईची मागणी



मालेगाव : नववसाहत परिसरात मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे अपघात होत आहेत. वृद्ध व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळपासून ही मोकाट जनावरे रस्त्यावर, नगर, कॉलन्यांमध्ये मोकाट फिरत असतात. जनावरांचे मालक दिवसभर या जनावरांना मोकाट सोडून देतात व सायंकाळी ही जनावरे बरोबर घरी जात असतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सदर जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांकडून हल्ला होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. शहरातील अनेक भागात मुख्य रस्त्यावर ही मोकाट जनावरे दिवसभर मध्यभागी बसून असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. शहरातील सोयगाव, कॅम्प, सोमवार बाजार, सोयगाव बाजार, नववसाहत आदी भागात मोकाट जनावरांचे प्रमाण अधिक आहे. या भागातही मोकाट जनावरांकडून अनेक वेळा हल्ले झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त
करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्लॅस्टिक कचरा जनावरांच्या जिवावर
पानांच्या पत्रावळीची जागा आता प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण व ग्लासने घेतली आहे, मात्र चकाचक दिसणारी पत्रावळीचे लवकर विघटन होत नसल्याने या पत्रावळीमुळे मोकाट जनावरे व पर्यावरणावर यांच्यावर विपरित परिणाम होत आहे. अन्न चिकटलेल्या पत्रावळ्या, कचरा कुंड्यांमध्ये साचलेले प्लॅस्टिकचा कचरा मोकाट जनावरांच्या जिवावर उठला आहे. प्लॅस्टिकबंदी होऊनही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी मनपाकडून केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच मात्र या जनावरांचे मालक सकाळी दुभत्या जनावरांचे दूध काढून त्यांची वासरे घरी ठेवतात व गायींना दिवसभर शहरात मोकाट फिरण्यासाठी सोडून देतात. महापालिका प्रशासनाने अशा मालकांवर कारवाई करावी, नाहीतर मोकाट जनावरांसाठी कोंडवाडे बनवावेत.
- अ‍ॅड. आर. के. बच्छाव, अध्यक्ष, मालेगाव वकील संघ.

मोकाट जनावरांमुळे विद्यार्थी व वृद्ध नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. रस्त्यावर जनावरांच्या झुंडीच्या झुंडी ठिय्या देऊन बसलेले असतात. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागतात. जनावरांची झुंज होत असते. या झुंजींमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नववसाहतीत मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. मनपाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
- प्रदीप पगार, रहिवासी.

Web Title: Mobilize animals in neonatal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.